‘स्त्री 2’ नंतर पसरलेल्या ‘त्या’ अफवांवरून राजकुमार राव वैतागला; म्हणाला “मी मूर्ख वाटलो का?…”,

‘स्त्री 2’ नंतर पसरलेल्या ‘त्या’ अफवांवरून राजकुमार राव वैतागला; म्हणाला “मी मूर्ख वाटलो का?…”,

बॉक्सऑफिसवर जेव्हा एखादा चित्रपट धमाकेदार चालतो तेव्हा त्याची चर्चा तर होतेच पण सोबतच अनेक अफवांना तोंड फुटतं. त्या चित्रपटाबद्दल असो किंवा त्या चित्रपटातील कलाकारांबद्दल असो. अशाच काही अफवांना एक अभिनेता वैतागला आहे.

‘स्त्री 2’ ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेला पाहायला मिळाला. या चित्रपटाने भारतात 600 कोटींची कमाई केली तर जगभरात 900 कोटींहून अधिक कमाई केली.मात्र या चित्रपटाच्या यशानंतर चित्रपटातील सर्वच कलाकारांचे कौतुक झाले. पण सोबत चित्रपटातील अभिनेता राजकुमार रावबाबत मात्र बऱ्याच अफवा पसरू लागल्या. या अफवांना आता राजकुमार राव पुरता वैतागला आहे. ती अफवा आहे की ‘स्त्री 2’ च्या यशानंतर ‘या’ राजकुमारने त्याच्या मानधनात वाढ केली आहे.

अखेर मौन सोडलं

चित्रपटाच्या यशानंतर राजकुमार रावने या अफवांना वैतागून अखेर मौन सोडलं आहे तसेच नेमकं काय खरं आहे तेही सांगितलं आहे. चित्रपटानंतर कलाकारांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळालं आहे. . श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या सोशल मीडिया फॉलोअर्समध्येही वाढ झाली. दरम्यान, या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता राजकुमार राव याने त्याची फी वाढवली असल्याचे बोलले जात आहे. मात्र याला राजकुमारने साफ नकार दिला आहे.

मानधनात वाढ खरंच केली आहे का?
फी वाढवण्याच्या चर्चांवर राजकुमार राव म्हणाला की, “मी दररोज वेगवेगळे आकडे वाचतो. माझ्या निर्मात्यांवर बोजा वाढवण्याइतका मी मूर्ख नाही. सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा भाग झाल्यानंतर मी अभिनेता म्हणून बदललो नाही. माझ्या आवडीचं काम करण्याचं पैसा हा बाय प्रोडक्ट आहे. मला माझं संपूर्ण आयुष्य काम करायचं आहे, म्हणून मी अशा भूमिका शोधत आहे, ज्या आश्चर्यचकित करतील, उत्साहित करतील, मला आव्हान देतील आणि माझा विकास होण्यास मदत करतील”. असं म्हणत त्याने या अफवांवर पूर्णविराम लावला आहे.

राजकुमार रावचा ‘मालिक’ हा नवीन चित्रपट प्रेक्षांच्या भटीला 

दरम्यान राजकुमार राव नवीन चित्रपट प्रेक्षांच्या भटीला येणार आहे. ‘मालिक’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करायाला राजकुमार राव येणार आहे. काही आठवड्यांपूर्वी मालिक चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं, ज्यामध्ये तो दमदार स्टाईलमध्ये दिसत होता. तसेच मालिक चित्रपट हा एक ॲक्शन थ्रिलर असणार आहे.

मालिक चित्रपटाच्या पोस्टरमध्ये राजकुमार राव जीपच्या वर एके-47 घेऊन उभा असल्याचं दिसत होता. त्याचा लूक आणि त्यांच्या चेहऱ्यावरील भाव याने लक्ष वेधून घेतलं. सध्या या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. राजकुमार राव पहिल्यांदाच गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;