Photo – शिवानी-अंबरच्या लग्नाची सुरु आहे जय्यत तयारी, बॅचलर पार्टीचे फोटो केले शेअर
‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री संजीवनी अर्थातच शिवानी सोनार सध्या चर्चेत आली आहे. शिवानीचा काही महिन्यांपूर्वी अभिनेता अंबर गणपुळेसोबत साखरपुडा झाला. त्यांनी फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर चाहत्यांना सुखद धक्का बसला.लवकरच ही गोड जोडी लग्नबंधनात अडकणार असून दोन्ही घरात लगीनघाई सुरु झाली आहे. शिवानी आणि अंबरने नुकतीच त्यांच्या मित्रमैत्रीणींसोबत ब्राईड टू बी आणि ग्रूम टू बी ची पार्टी केली आणि त्याचे फोटो सोशल मीडिया अकाऊंट इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये दोघंही सुंदर असून त्यांच्या मित्र-मैत्रीणींसोबत मजा करताना दिसत आहेत.


About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List