गृहमंत्र्यांना भेटून रश्मी शुक्ला यांनी आचारसंहितेचा भंग केला, कारवाई करण्याची काँग्रेसची मागणी

गृहमंत्र्यांना भेटून रश्मी शुक्ला यांनी आचारसंहितेचा भंग केला, कारवाई करण्याची काँग्रेसची मागणी

राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या असून निकालही जाहीर झाले आहेत. या काळात आचारसंहिता लागू असते. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर आयपीएस अधिकारी रश्मी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आचारसंहितेच्या काळात त्यांनी गृहमंत्र्यांची भेट घेत आचारसंहितेचा भंग केला आहे. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेत रश्मी शुक्ला यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. याबाबत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी माहिती दिली आहे.

अतुल लोंढे म्हणाले की, तेलंगणामध्ये अशाच प्रकारे पोलीस महासंचालक व एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वरिष्ठ मंत्र्याची भेट घेतली होती. त्यावेळी निवडणूक आयोगाने त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली होती. गैरभाजपाशासित राज्यात निवडणूक आयोग तात्काळ कारवाई करते पण भाजपाशासित राज्यात निवडणूक आयोग काहीह कारवाई करताना दिसत नाही. आचरसंहिता भंगांच्या घटनांकडे निवडणूक आयोग डोळेझाक करत आहे. या घटनेची निवडणूक आयोगाने दखल घेत कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच रश्मी शुक्ला यांच्यावर विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यासारखे गंभीर गुन्हे आहेत, याची आठवणही त्यांनी करून दिली.

रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवावे अशी मागणी काँग्रेस पक्षाने निवडणुकीच्या काळात केली असता त्यांना पदावरून हटवण्यात आले आहे. विधानसभेचा निकाल लागला असला तरी निवडणूक आचारसंहिता संपण्यापूर्वीच गृहमंत्र्यांना भेटून रश्मी शुक्ला यांनी आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केले आहे. त्यांच्यावर तातडीने कारावाई झाली पाहिजे, अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;