मोठ्या ताकदीने पुन्हा उभारी घेऊ, आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला निर्धार

मोठ्या ताकदीने पुन्हा उभारी घेऊ, आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला निर्धार

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला असून महायुतीचा विजय झाला आहे. पण आपण मोठ्या ताकदीने पुन्हा उभारी घेऊ असा निर्धार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकून आदित्य ठाकरे म्हणाले की या निवडणुकीत तुमच्या पाठिंब्यसाठी आणि आशिर्वादासाठी धन्यवाद. अनेकांचे आभार मानणे मला शक्य झाले नाही त्याबद्दल माफी. ही निवडणूक विश्लेषणापलीकडची होती, आणि त्यात जनतेचा जो आशीर्वाद मिळाला तो उत्साह देणारा आहे. आम्ही पुन्हा उभारी घेऊ, ती ही मोठ्या ताकदीने. आणि पूर्वी पेक्षा चांगलं सर्वांसाठी महाराष्ट्र उभा करू असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;