‘प्रचंड वाईट वाटतं जेव्हा…’, नको त्या गोष्टीचा सामना, मनिषा कोईरालाकडून मनातील खंत अखेर व्यक्त

‘प्रचंड वाईट वाटतं जेव्हा…’, नको त्या गोष्टीचा सामना, मनिषा कोईरालाकडून मनातील खंत अखेर व्यक्त

Manisha Koirala: गोव्यात सुरू असलेल्या 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बॉलिवूडची व्हर्सेटाईल अभिनेत्री मनीषा कोईराला देखील सहभागी झाली होती. चित्रपट महोत्सवात अभिनेत्रीने अनेक वर्षांनंतर मनातील खंत बोलून दाखवली… सांगायचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून मनिषा बॉलिवूडपासून दूर आहे. पण ‘हीरामंडी’ सीरिजमुळे मनिषा हिला पुन्हा स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळाली. दरम्यान ‘एकेकाळी अभिनेत्री होती…’ हा शब्द आपल्यासाठी वापरण्यात येत आहे… हे प्रचंड वाईट आहे… असं अभिनेत्री चित्रपट महोत्सवात म्हणाली. शिवाय इतर अभिनेत्रींबद्दल देखील मनिषाने वक्तव्य केलं आहे.

चित्रपट निर्माता विक्रमादित्य मोटवानी यांच्यासोबत कार्यक्रमात बोलत असताना मनिषाने मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. शिवाय ओटीटी प्लॅटफॉर्मचं भविष्य आणि ओटीटीचा कलाकार आणि वरिष्ठ कलाकारांवर काय प्रभाव पडेल यावर देखील त्यांनी चर्चा केली.

मनिषा म्हणाली, ‘एकेकाळी अभिनेत्री होती… हे शब्द प्रचंड वाईट आहेत आणि हे कायम महिला कलाकारांसोबत होतं. पण ओटीटीमुळे अनेक बदल झाले आहे. आज नीना गुप्ता यांसारख्या अभिनेत्रींनी नव्या संधी मिळत आहेत. आज नीना गुप्ता ओटीटीवर दमदार काम करत आहेत…’ असं मनिषा म्हणाली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by IFFI (@iffigoa)

 

सांगायचं झालं तर, दिग्दर्शत संजर लीला भन्सळी यांच्या ‘हीरामंडी’ सीरिजमध्ये मनिषा हिने वेश्यालयाच्या मालकिणीची भूमिका साकारली होती. अभिनेत्रीच्या भूमिकेचं नाव ‘मल्लिकाजान’ असं होतं. सीरिजमध्ये मनिषा हिच्यासोबत सोनाक्षी सिन्हा, अदिति राव हैदरी, ऋचा चड्ढा यांच्यासोबत अनेक सेलिब्रिटींनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.

मनिषा कोईराला हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री सध्या ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ सीरिजच्या दुसऱ्या भागासाठी काम करत आहे. सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. चाहत्यांना देखील सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा आहे.

मनिषा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत मनिषा हिचं नाव अव्वल स्थानी होतं. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत मनिषा हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आज मनिषा मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील मनिषाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;