युक्रेनच्या तावडीतून रशियाने 40 टक्के जमीन सोडवली

युक्रेनने ऑगस्टमध्ये रशियाच्या कुर्स्क भागात अचानक हल्ले केले होते. यावेळी युक्रेनने कुर्स्कचा मोठा प्रदेश ताब्यात घेतला होता. मात्र, आता रशियाने युक्रेनच्या ताब्यातून 40 टक्के जमीन परत मिळवली आहे.  रशियाने कुर्स्क भागात 59 हजार सैनिक तैनात केले आहेत.

युक्रेनच्या अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनने कुर्स्क प्रांतातील 1376 चौरस किमी जमीन ताब्यात घेतली होती. मात्र, रशियाच्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत हे क्षेत्र आता केवळ 800 चौरस किमी इतके कमी झाले आहे. शत्रू सतत हल्ले करत आहेत, पण आम्ही हा परिसर आमच्या ताब्यात ठेवू.

रशियाने  डागले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र

गेल्या आठवडय़ात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युव्रेनला रशियामध्ये खोलवर हल्ला करण्याची परवानगी दिली होती. यानंतर 19 नोव्हेंबरला पहिल्यांदा युक्रेनने रशियाच्या ब्रायन्स्क भागात अमेरिकेकडून मिळालेली 6 लांब पल्ल्याची एटीएसीएमएस क्षेपणास्त्रे डागली. रशियाने 5 क्षेपणास्त्रे पाडल्याचा दावा केला आहे.

रशियाने उत्तर कोरियाचे सैन्य केले तैनात  

युक्रेनच्या जनरल स्टाफने सांगितले की, रशियाने कुर्स्कमध्ये सुमारे 11 हजार उत्तर कोरियाचे सैनिक तैनात केले आहेत. मात्र, त्यापैकी बहुतांश जण अजूनही प्रशिक्षण पूर्ण करत आहेत. युव्रेनच्या या दाव्याला रशियाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;