अरबाज खानची पत्नी मलायकाच्या मुलासोबत खेळली क्रिकेट; नेटकरी म्हणाले ‘टॉम अँड जेरी..’

अरबाज खानची पत्नी मलायकाच्या मुलासोबत खेळली क्रिकेट; नेटकरी म्हणाले ‘टॉम अँड जेरी..’

अभिनेता अरबाज खानची दुसरी पत्नी आणि मेकअप आर्टिस्ट शुरा खान सतत काही ना काही कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. शुराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडीओमध्ये शुरा तिच्या सावत्र मुलासोबत क्रिकेट खेळताना दिसतेय. अरबाज आणि मलायका अरोरा यांचा मुलगा अरहान खान याच्याशी तिची चांगली मैत्री झाली आहे. ही मैत्री या व्हिडीओतही स्पष्ट पहायला मिळतेय. इमारतीच्या खाली मोकळ्या जागेत अरहान आणि शुरा क्रिकेट खेळत होते, तेव्हाच पापाराझींनी त्यांचा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

अरहान आणि शुराच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काहींनी त्यावरून दोघांना ट्रोलसुद्धा केलंय. ‘एका छोट्याशा ग्राऊंडमध्ये टॉम आणि जेरी क्रिकेट खेळल्यासारखं वाटतंय’, असं एकाने लिहिलंय. तर ‘या क्षणात आयुष्याचे ध्येय पूर्ण झाले आहेत’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘या क्रिकेटपेक्षा आम्हाला आयपीएल बघण्यात रस आहे’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय. याआधीही अरहान आणि शुरा एकत्र दिसले होते. या दोघांमध्ये चांगला संवाद असल्याचं जुन्या व्हिडीओंमध्येही पहायला मिळालं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

नोव्हेंबर महिन्यात अरहानने त्याचा 22 वा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्त शुराने त्याच्यासाठी खास पोस्ट लिहिली होती. शुराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अरहानचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये अरहान गिटार वाजवताना दिसून आला होता. या व्हिडीओवर तिने लिहिलं होतं, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या मित्रा आणि माझं कुटुंब अरहान. तू जसा आहेस तसाच राहिल्याबद्दल धन्यवाद.’ यासोबतच तिने हृदयाचा इमोजी पोस्ट केला होता.

अरबाज खानने 24 डिसेंबर 2023 रोजी मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी दुसऱ्यांदा निकाह केला. या लग्नात अरहानसुद्धा उपस्थित होता आणि त्याने सावत्र आईसोबत फोटोसाठी पोझसुद्धा दिले होते. अरबाज आणि शुरा यांना त्यांच्या वयातील अंतरावरूनही ट्रोल केलं गेलं. इतकंच नव्हे तर शुरा ही अरबाजची पत्नी नव्हे तर मुलगी वाटते, असेही कमेंट्स नेटकऱ्यांनी केले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;