ऐश्वर्या राय सोबत घटस्फोटांच्या चर्चांवर अभिषेकची स्पष्ट भूमिका; म्हणाला, ‘मी काहीही बदलू शकत नाही…’

ऐश्वर्या राय सोबत घटस्फोटांच्या चर्चांवर अभिषेकची स्पष्ट भूमिका; म्हणाला, ‘मी काहीही बदलू शकत नाही…’

Abhishek Bachchan on Divorce rumours: अनेक महिन्यांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. अनेक वर्ष एकत्र संसार केल्यानंतर ऐश्वर्या – अभिषेक आता विभक्त होतील का? असा प्रश्न चाहते सतत विचारत आहेत. पण घटस्फोटाच्या चर्चांवर दोघांनी देखील आतापर्यंत मौन बाळगलं आहे. पण अभिषेक याने ‘आय वॉन्ट टू टॉक’ सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान रंगणाऱ्या चर्चांमुळे झालेल्या समस्यांबाबत मोठा खुलासा केला आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिषेक बच्चन म्हणाला. ‘आयुष्यात कितीही अडचणी आल्यातरी व्यक्तीसा आशेच्या किरणाचा शोध घ्यायला हवा… ‘ सध्या अभिनेता आयुष्यात सुरु असलेल्या नकारात्मक गोष्टींचा सामना करत आहे. अभिषेक म्हणाला, ‘हिंदीमध्ये एक शब्द आहे… ‘दृढता’… कुठे न कुठे… एक व्यक्तीच्या रुपात तुम्ही कोण आहात हे कधीही बदलू नये. स्वतःचे मूलतत्त्व कधीही बदलू नये…’

पुढे अभिषेक म्हणाला, ‘जर वाईट वाईटाला सोडत नाही तर, आपण आपला चांगूलपणा का सोडवा? मी जे काही आहे त्याला बदलू शकत नाही. मी एक सकारात्मक व्यक्ती आहे. नकारात्मक गो।ष्टींवर मी लक्ष देत नही. जर तुम्ही नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देता तेव्हा त्याच नकारात्मक गोष्टी तुमच्यावर वरचढ ठरतात…’ असं देखील अभिनेता म्हणाला.

‘कठीण काळात तर तुम्हाला आशेचं किरण दिसत असेल, तर त्याला पकडून ठेवा… कारण त्यामुळेच तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी योग्य दिशा मिळेल… आजकाल लोकांसाठी अंधारात आणि नकारात्मकतेत हरवून जाणे खूप सोपे आहे… अडथळे काहीही असोत, तुमचा आशेचा किरण शोधा…’ असं देखील अभिषेक बच्चन म्हणाला.

ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन लग्न

ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला 17 वर्ष पूर्ण झाली आहे. 2007 मध्ये ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन यांनी लग्न केलं. दोघांना एक मुलगी आराध्या देखील आहे. आराध्या हिला कायम आई ऐश्वर्या हिच्यासोबत स्पॉट केलं जातं. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक दोघींसोबत दिसत नसल्यामुळे ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;