स्नॅपचॅटवरील मैत्री महागात पडली; मुलीवर अतिप्रसंग
स्नॅपचॅटवर झालेली मैत्री 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला चांगलीच महागात पडली आहे. ओळख झाल्यानंतर विकृत तरुणाने तिला भेटण्याच्या बहाण्याने घरी बोलावले व तिच्यावर जबरदस्ती अतिप्रसंग केला. ऋतिक वास्कर (22) असे अतिप्रसंग करणाऱ्या विकृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भाईंदर पोलिसांनी ऋतिकविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दादर परिसरात राहणाऱ्या ऋतिकने पीडित मुलीसोबत स्नॅपचॅटवर ओळख केली. त्यांच्या मैत्रीला 10 ते 15 दिवस उलटत नाही तोच त्याने पीडितेला सकाळी साडेसहा वाजता त्याच्या घरी भेटण्यासाठी बोलावले. दरम्यान ऋतिकचा भाऊ सकाळी नऊ वाजता कामावर गेल्यानंतर त्या विकृताने संधीचा फायदा घेत तिच्यावर अतिप्रसंग केला आणि दादर स्टेशनला आणून सोडले. मात्र पीडितेची प्रकृती अचानक बिघडल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दादर पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. पुढील तपास दादर पोलीस करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List