पुरोगामी महाराष्ट्रातील खेळी समजण्याच्या पलीकडे, निकाल आश्चर्यकारक-अपेक्षित नाहीत – यशोमती ठाकूर

पुरोगामी महाराष्ट्रातील खेळी समजण्याच्या पलीकडे, निकाल आश्चर्यकारक-अपेक्षित नाहीत – यशोमती ठाकूर

विधानसभा निवडणुकीत लागलेले निकाल अत्यंत आश्चर्यजनक आणि  हे निकाल शाहू-फुले- आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राला अजिबात अपेक्षित नाहीत. विरोधी पक्षाला पूर्णपणे दाबून टाकण्याचा हा प्रयत्न आहे. पुरोगामी महाराष्ट्रात काय खेळी चालली आहे हे समजण्याच्या पलीकडे आहे, अशी खंत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली.

विधानसभा निवडणुकीत यशोमती ठाकूर यांचा पराभव झाला, पण त्यांनी समाजमाध्यमातून मतदारांचे आभार मानले आणि संपूर्ण महाराष्ट्रात लागलेल्या निकालाबद्दल आश्चर्य व्यक्त केले.

राज्यातील मतदारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या  की,  ‘ज्या  ज्या मतदारांनी महाविकास आघाडीला मतदान केले आणि विधानसभा निवडणुकीत मतदान केले त्याचे आभार मानले, पण निकाल आश्चर्यजनक आहेत. हे निकाल अपेक्षित नाहीत. आपला महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. या पुरोगामी महाराष्ट्रात काय  खेळी केलेली आहे हे समजण्याच्या पलीकडे आहे. पण नक्कीच काही तरी झालेले आहे. विरोधी पक्ष पूर्णपणे दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला आणि हे लोकशाहीच्या विरोधात आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. ज्या प्रकारे देश चालला आहे त्या सर्व गोष्टी आपण आवर्जून बारीकपणे बघितल्या पाहिजेत आणि त्यावर काय पावले उचलायची ती उचलली पाहिजे. शाहू-फुले- आंबेडकरांचा हा महाराष्ट्र अशा प्रकारचा निकाल नाही देऊ शकत याच्यावर माझा विश्वास आहे. पराभूत झाले असतो तरी हा काही शेवट नाही. आमची लढाई लोकशाही वाचवण्याची आहे आणि ती लढाई सुरू राहील. विरोधी पक्ष म्हणून आम्ही ते करणारच आहोत. तुमचे पाठबळ आमच्या पाठीशी राहावे अशी अपेक्षा आहे. लोकशाहीत जर कोणी काही गडबड करू इच्छित असेल तर आपण त्याच्याकडे कटाक्षाने पाहिले पाहिजे,’ असे आवाहन त्यांनी केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;