सीएनजीच्या दरवाढीची झळ, मुंबईत रिक्षा प्रवास महागण्याची शक्यता

सीएनजीच्या दरवाढीची झळ, मुंबईत रिक्षा प्रवास महागण्याची शक्यता

महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात किलोमागे दोन रुपयांची वाढ केली असून त्याची झळ मुंबईकरांच्या खिशाला बसणार आहे. मुंबईच्या उपनगरांत धावणाऱया रिक्षाच्या भाडेदरात वाढ होण्याची शक्यता आहे. रिक्षाच्या भाडेदरात प्रति किलोमीटर 2 ते 2.50 रुपयांची वाढ करण्याची मागणी रिक्षा युनियनने केली आहे. त्यामुळे मुंबईकरांचा रिक्षा प्रवास महागणार आहे.

महानगर गॅस लिमिटेडने 22 नोव्हेंबरपासून सीएनजीच्या दरात वाढ केली असून त्यानुसार आता प्रतिकिलो सीएनजीसाठी 75 ऐवजी 77 रुपये मोजावे लागत आहेत. मुंबईतील रिक्षा, टॅक्सी, बस यांसारखी सार्वजनिक परिवहन वाहने सीएनजीवर विसंबून असतात. त्यामुळे या वाहनांना सीएनजीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार असून त्याचा भुर्दंड मुंबईकरांना सोसावा लागणार आहे. सार्वजनिक परिवहन वाहनांपैकी रिक्षाचालकांच्या युनियनने भाडेदरात दोन रुपयांची वाढ करण्याची मागणी पुढे रेटली आहे. सरकारने मान्यता दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार रिक्षाच्या भाडे दरात प्रति किलोमीटर 2 ते 2.50 रुपयांची वाढ झाली पाहिजे, असे मुंबई रिक्षामन युनियनच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

मुंबई शहरासह संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात दहा लाखांहून अधिक वाहने सीएनजी इंधनावर चालतात. रिक्षापाठोपाठ टॅक्सी व इतर वाहनांच्या भाडेदरात वाढ होण्याची शक्यता आहे. 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;