गृहप्रकल्प नोंदणीत येणार पारदर्शकता; महारेराशी सर्व महापालिका, स्थानिक प्रशासनाने जोडली जाणार

गृहप्रकल्प नोंदणीत येणार पारदर्शकता; महारेराशी सर्व महापालिका, स्थानिक प्रशासनाने जोडली जाणार

राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका व अन्य स्थानिक प्रशासनांनी त्यांचे संकेतस्थळ महारेरा पोर्टलशी जोडावे, असे महत्त्वपूर्ण आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. गृहप्रकल्प नोंदणीसाठी दिलेल्या कागदपत्रांची सत्यता तपासणीसाठी ही कार्यवाही आवश्यक आहे, असेही न्यायालयाने नमूद केले.

मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. तीन महिन्यांत ही कार्यवाही सर्व महापालिका व स्थानिक प्रशासनांनी पूर्ण करावी. तोपर्यंत गृहप्रकल्पांची सर्व कागदपत्रे जारी केल्यानंतर दोन दिवसांत संकेतस्थळावर प्रसिद्ध करा, असेही न्यायालयाने सर्व पालिका व स्थानिक प्रशासनांना सांगितले आहे.

जून 2023 पासूनच्या सर्व प्रकल्पांची तपासणी

जून 2023 पासून विकासकांनी नोंदणीसाठी दिलेल्या भोगवटा प्रमाणपत्रांची सत्यता महारेराने तपासावी. प्रमाणपत्राची सत्यता तपासल्यानंतर नोंदणी करावी. अधिकृत गृहप्रकल्पांची नोंदणी होईल याची काळजी महारेराने घ्यावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

काय आहे प्रकरण…

डोंबिवलीतील संदीप पाटील यांनी ही जनहित याचिका केली होती. गृहप्रकल्पासाठी नोंदणी होणाऱया कागदपत्रांची सत्यता योग्य प्रकारे तपासली जावीत. अनधिकृत इमारतींची नोंदणी होणार नाही यासाठी धोरण तयार करावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.

  • प्रशासनांनी सर्व अधिकृत व अनधिकृत इमारतींची माहिती ठेवावी. ही माहिती सार्वजनिकरीत्या उपलब्ध करावी. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करणाऱया गृहप्रकल्पांची नोंदणीच करू नका, असेही शासनाने म्हटले आहे. विकासकांच्या कागदपत्रांची सत्यता तपासल्यानंतर नोंदणी झाल्यास बोगस गृहप्रकल्प तयारच होणार नाहीत, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला.
  • 65 बोगस भोगवटा प्रमाणपत्रांची माहिती आम्हाला मिळाली आहे. यातील 64 प्रकल्पांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुंबई पालिकेशी महारेरा जोडली गेली आहे. तशा प्रकारे अन्य पालिका व स्थानिक प्रशासनांना महारेराशी जोडण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती महारेराने न्यायालयाला दिली.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;