गॅस टँकर पलटी, पाच तास चक्का जाम

गॅस टँकर पलटी, पाच तास चक्का जाम

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावरील वारजे ओव्हर ब्रिजजवळ एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याची घटना सकाळी साडेदहा वाजता घडली. टँकर रस्त्यात पूर्णपणे आडवा झाला होता. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. तब्बल साडेचार ते पाच तास रस्त्यावर काsंडी झाली होती. अखेर साडेचारच्या सुमारास पाच व्रेनच्या माध्यमातून टँकर सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. घटनेचे नेमके कारण समजू शकले नाही.

इण्डेन पंपनीचा एलपीजी गॅस भरलेला टँकर मुंबईहून साताऱयाच्या दिशेने निघालेला होता. साडेदहाच्या सुमारास वारजे ओव्हर ब्रीजजवळील टाटा मोटर्स शोरूमसमोर आल्यानंतर टँकर पलटी झाला. ड्रायव्हर केबिनसह पुढचा भाग थेट समोरील ट्रकवर घुसला. सुदैवाने समोरच्या बाजूने येणारे कोणतेही वाहन त्यावेळी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. अपघातात कोणी जखमी नाही. मात्र, घटनेनंतर दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. टँकर आकाराने मोठा असल्याने वाहने ये जा करण्यास अडचणी येत होत्या. या घटनेमुळे परिसरात प्रचंड वाहतूक काsंडी झाली. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, टँकर भरलेला असल्याने तो हटविण्यासाठी मर्यादा येत होत्या. या दरम्यान वाहनधारकांना पर्यायी मार्गावरून वळविण्यात आले. मात्र, वाहनधारकांना प्रचंड वाहतूककाsंडीचा सामना करावा लागला. महामार्गावर चार ते पाच किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. मुख्य मार्ग जाम झाल्याने सेवा रस्त्यांवर देखील वाहनांची वर्दळ वाढून काsंडी झाली होती. अखेर साडेचारच्या सुमारास पाच व्रेन आणून संबंधित टँकर सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आला. त्यानंतर काही वेळाने वाहतूक सुरळीत झाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;