किरकोळ वादातून केली हत्या

किरकोळ वादातून केली हत्या

किरकोळ वादातून एकाची हत्या झाल्याची घटना गिरगाव येथे घडली. मृताची ओळख पटली नाही. या प्रकरणी व्ही. पी रोड पोलिसांनी समीर शौकत मोमीनला अटक केली. समीरविरोधात 9 गुन्हे दाखल आहेत. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.

शनिवारी पहाटे मृत व्यक्ती आणि समीरचा वाद झाला. वाद झाल्यावर धक्काबुकी करून मृताला खाली पाडले. त्यानंतर समीरने मृताचे डोके फुटपाथच्या कडेला आपटून त्याला गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर समीर तेथून निघून गेला. सिंगापूरवाला इमारत परिसरात एक जण जखमी अवस्थेत पडल्याची माहिती एकाने पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर काहीच वेळात व्ही. पी. रोड पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी जखमीला जे.जे. रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृताची ओळख पटली नाही.

घडल्याप्रकरणी व्ही.पी. रोड पोलिसांनी गुन्हा नोंद केला. तपासादरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. फुटेजवरून पोलिसांनी समीरला ताब्यात घेऊन अटक केली. समीरविरोधात एकूण 9 गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी समीरवर प्रतिबंधात्मक कारवाईदेखील केल्याचे समजते. हत्येच्या गुह्यात पोलिसांनी समीरला अटक करून न्यायालयात हजर केले होते. हत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;