“असाच आहे आमचा रहमान”, हनिमूनच्या दिवशी पत्नीला एकटं सोडून निघून गेला; रहमानच्या भावाने सांगितला रहमानचा तो किस्सा

“असाच आहे आमचा रहमान”, हनिमूनच्या दिवशी पत्नीला एकटं सोडून निघून गेला; रहमानच्या भावाने सांगितला रहमानचा तो किस्सा

एआर रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानो यांनी नुकतीच सोशल मीडियावर विभक्त होण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर सोशल मीडियावर एआर रेहमानच्या खासगी आयुष्याविषयी चर्चा सुरू आहे.

एआर रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानो यांनी नुकतेच सोशल मीडियावर हे दोघे एकमेकांपासून वेगळे होत असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर दोघांचे वैयक्तिक आयुष्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. लोक वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या विभक्त होण्याबद्दल चर्चा करत आहेत. या दोघांनी आपला 29 वर्षांचे वैवाहिक नाते संपवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच याच पार्श्वभूमीवर रहमान आणि त्याच्या पत्नीच्या जुन्या मुलाखती किंवा त्यात सांगितलेले त्यांचे किस्से आता व्हायरल होऊ लागले आहेत.

रहमानचा भावाने सांगितला त्याच्या हनिमूनचा किस्सा

काही दिवसांपूर्वी दोघांशी संबंधित रहमानच्या भावाने सांगितलेला एक व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रहमानच्या भावाने या दोघांच्या हनिमूनचा एक किस्सा सांगितला आहे.

रहमानच्या भावाने म्हटले होते की, ‘मला आठवतं आहे की, जेव्हा रहमानचे लग्न झाले, तेव्हा तो वहिनीला एका हिल स्टेशनवर हनिमूनला घेऊन गेला होता. त्या रात्री मी त्यांना फोन केला होता. रात्रीचे 12-1 वाजले असतील. सायरा वहिनीने माझा फोन उचलला आणि ती झोपेतच होती. मी तिला रहमान कुठे आहे, असे विचारलं. तर, त्यावर तिने उत्तर देताना म्हटलं की, मला माहित नाही. त्यावेळी रहमान दुसऱ्या खोलीत वीणा वादनाचा सराव करत होता. त्याच्या डोक्यात कधीही कोणतीही धून येऊ शकते. असाच आहे आमचा रहमान.’

हा किस्सा सांगत रहमानच्या भावाने रहमानसाठी त्याच्या आयुष्यात पहिल्या स्थानावर त्याचे म्यूजिक असल्याचे म्हटले.

#अरसायरा ब्रेकअप

दरम्यान एआर रहमानने घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट देखील शेअर केली होती. त्यात असं म्हणण्यात आलं होतं की ‘आम्हाला वाटले होते की, आम्ही लग्नाची ३० वर्षे पूर्ण करू, परंतु आता सगळं संपलं आहे. देवाचे सिंहासनही तुटलेल्या हृदयाच्या ओझ्याखाली थरथरू शकते. तरीही, या कंपनात देखील आपण अर्थ शोध राहतो, मात्र तुकड्यांना त्यांची जागा पुन्हा मिळू शकत नाही. मित्रांनो, आम्ही या नाजूक परिस्थितून जात असताना तुम्ही दाखवलेल्या या दयाळूपणाबद्दल आणि आमच्या गोपनीयतेचा आदर केल्याबद्दल धन्यवाद. #अरसायरा ब्रेकअप।’

या पोस्टमध्ये रहमानने त्यांच्या नात्याची एक दुसरी बाजूही सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;