राज्यातून बाहेर जाणारे व्यवसाय चिंतेचा विषय, पुढील पाच वर्षात मी याकडे लक्ष देईन – रोहित पाटील

राज्यातून बाहेर जाणारे व्यवसाय चिंतेचा विषय, पुढील पाच वर्षात मी याकडे लक्ष देईन – रोहित पाटील

राज्याचे विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यातच माजी उपमुख्यमंत्री आर.आर पाटील यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांनी अजित पवार गटाच्या संजयकाका पाटील यांचा प्रभाव केला आहे. रोहित पाटील यांनी 128403 मते मिळवून विजयाची नोंद केली. दरम्यान, आज विजयानंतर माध्यमांशी संवाद साधताना रोहित पाटील म्हणाले आहेत की, ”राज्यातून बाहेर जाणारे व्यवसाय चिंतेचा विषय, पुढील पाच वर्षात मी याकडे लक्ष देईन.”

रोहित पाटील म्हणाले की, ”आठ- नऊ वर्ष जे कष्ट केलं, त्याचं फळ माझ्या मतदारसंघातील लोकांनी दिलं आहे. मला आनंद आहे की, जे काम मला अनौपचारिक पद्धतीने करायला मिळत होतं, ते आता औपचारिक पद्धतीने करायला मिळेल.”

पाटील म्हणाले, ‘येथे चांगल्या कंपन्या आणणं हे आमचं उद्दिष्ट असणार आहे. राज्यात रोजगाराचा घटता दर आणि राज्यातून बाहेर जाणारे व्यवसाय – उद्योग चिंतेचा विषय आहे. याकडेच जाणीवपूर्वक लक्ष देण्याची माझी पुढील पाच वर्षांची भूमिका असणार आहे.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;