ताईंनी धोका द्यायला नको होता….निवडून येताच भाजपच्या सुरेश धस यांचे पंकजा मुंडेंवर टिकास्त्र

ताईंनी धोका द्यायला नको होता….निवडून येताच भाजपच्या सुरेश धस यांचे पंकजा मुंडेंवर टिकास्त्र

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आष्टीमधील नवनिर्वार्चित आमदार सुरेश धस यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. पंकजा मुंडे यांनी आपल्याविरोधात काम केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

पंकजाताई, मी तुम्हाला बहीण मानत होतो. पण तुम्ही माझ्याविरोधात काम केलं. पंकजा ताईंनी मला धोका द्यायला नको होता. आष्टीमधील नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंवर टीका केली आहे. पंकजाताईंनी माझ्याविरोधात काम करण्यास कार्यकर्त्यांना सांगितल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आहे.

आष्टी विधानसभा मतदारसंघातून सुरेश धस यांचा 75 हजारांच्या मताधिक्यांनी विजय झाला आहे. दरम्यान विजयी झाल्यानंतर आयोजित केलेल्या सभेत सुरेश धस यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, पंकजाताईंनी मला धोका द्यायला नको होता. पंकजाताईंनी माझ्या विरोधात काम करण्यास कार्यकर्त्यांना सांगितल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले, पंकजाताई तुम्ही एक चांगल्या व्यक्ती गमावला असल्याचेही धस म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;