हिजाब न घातल्यामुळे…, अभिनेत्रीच्या नवऱ्याचा निवडणुकीत पराभव, ‘बिग बॉस’ स्पर्धकाने साधला निशाणा

हिजाब न घातल्यामुळे…, अभिनेत्रीच्या नवऱ्याचा निवडणुकीत पराभव, ‘बिग बॉस’ स्पर्धकाने साधला निशाणा

Maharashtra Election Results 2024: 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि महायुतीला बहुमत मिळाल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्ष सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. तर अनेक उमेदवारांना अपयश स्वीकारावा लागला आहे. अभिनेत्री स्वरा भास्कर हिचा पती फहाद अहमद यांना देखील अपयशाचा सामना कारावा लागला आहे. सांगायचं झालं तर अभिनेत्रीचा नवरा फहाद अहमद अणूशक्ती नगर येथून निवडणुकीच्या रिंगणात होते.

फहाद अहमद यांचा पराभव झाल्यानंतर अनेक चर्चा रंगल्या आहे. ‘बिग बॉस ओटीटी 2’ विजेता एल्विश यादव याने देखील फहाद अहमद यांच्या पराभवानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून मत व्यक्त केलं आहे. पत्नीला हिजाब न घालू दिल्यामुळे पराभव झाला… असं एल्विश सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला. निकालानंतर वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे एल्विश चर्चेत आला आहे.

एक्सवर फहाद अहमद यांचा एक व्हिडीओ रिट्विट करत एल्विश यादव म्हणाला, ‘स्वरा हिला हिजाबमध्ये न ठेवल्यामुळे तुझा पराभव झाला आहे. ही तुझी शिक्षा आहे…’ असं एल्विश ट्विट करत म्हणाला आहे. सध्या एल्विश याची सोशल मीडिया पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. एल्विशच्या वक्तव्यावर अद्याप स्वरा भास्कर हिने प्रतिक्रिया दिलेली नाही…

 

 

पतीच्या पराभवानंतर खुद्द स्वरा हिने देखील स्वतःचं व्यक्त केलं आहे. अभिनेत्री निकालानंतर EVM मशिनवर संशय व्यक्त केला आहे. ‘मतदान संपूर्ण दिवस असूनही ईव्हीएम मशीन 99% चार्च कसं होऊ शकतं? यावर निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे… अणुशक्ती नगर विधानसभेत 99% चार्ज मशीन उघडल्याबरोबर भाजप समर्थित राष्ट्रवादीला मते कशी मिळू लागली?’ असा प्रश्न देखील स्वरा भास्कर हिने उपस्थित केला आहे. स्वराच्या पोस्टवर नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.

एल्विश यादव आणि वादग्रस्त प्रकरणं…

एल्विश यादव गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर हिंदू धर्माचा प्रचार करत आहेत. एल्विश सोशल मीडियावर स्वतःच्या स्पष्ट भूमिका मांडताना दिसतो.. त्याच्यावर सापाच्या विषाच्या तस्करीचा गुन्हा देखील आहे. ईडी देखील एल्विशला सतत चौकशीसाठी बोलावत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;