‘ती माझ्या नवऱ्यासोबत माझं आयुष्य जगत आहे…’, चर्चांना उधाण

‘ती माझ्या नवऱ्यासोबत माझं आयुष्य जगत आहे…’, चर्चांना उधाण

Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत शिल्पा शेट्टी हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज शिल्पा बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. शिल्पाच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, शिल्पा उद्योजक राज कुंद्रा याची दुसरी पत्नी आहे. शिल्पा हिने राज याच्यासोबत लग्न केल्यानंतर त्याच्या पहिल्या पत्नीने शिल्पावर गंभीर आरोप केले होते. शिल्पाने स्वतःचा संसार थाटला पण माझा संसार मोडला… असे आरोप राज कुंद्रा याची पहिली पत्नी कविता हिने केले होते.

एका मुलाखतीत कविताने शिल्पावर गंभीर आरोप केले होते. राज कुंद्रा याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर कविता हिने शिल्पा शेट्टी हिला जबाबदार ठरवलं होतं. कविता म्हणाली होती, ‘आज मी शिल्पाचे राज सोबत फोटो पाहते, तर वाटतं शिल्पा माझ्या नवऱ्यासोबत माझं आयुष्य जगत आहे…’

‘जेव्हा मी माझं आणि राज लग्न टिकवण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा राज सतत शिल्पा हिच्याबद्दल बोलत असायचा… आमच्यामध्ये जे काही होत आहे त्याचा राजला काहीच फरक पडत नव्हता… कारण त्याच्या आयुष्यात माझ्यापेक्षा अधिक प्रसिद्ध महिलेची एन्ट्री झाली होती…’

‘राज सतत मला घटस्फोटासाठी त्रास देऊ लागला होता. तुला दुसरं लग्न करायचं आहे का? असं देखील मी त्याला अनेकदा विचारलं. पण तो कायम यावर बोलणं टाळायचा…’ असे अनेक आरोप कविता हिने शिल्पा शेट्टी याच्यावर केले. शिवाय कविता हिने शिल्पाला पत्र देखील पाठवलं होतं.

कविता हिने आरोप केल्यानंतर शिल्पा हिने देखील स्पष्टीकरण दिलं होतं. ‘माझ्यामुळे राज – कविता यांचा घटस्फोट झालेला नाही. दोघांचा घटस्फोट झाल्यानंतर राज आणि माझी ओळख झाली…’ सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर राज – शिल्पा यांनी लग्न केलं.

राज – शिल्पा आता त्यांच्या खासगी आयुष्यात आनंदी आहेत. लग्नानंतर शिल्पा हिने मुलाला जन्म दिला. त्यानंतर सरोगेसीच्या मदतीने मुलीचं जगात स्वागत केलं. शिल्पा सोशल मीडियावर कायम स्वतःचे आणि मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;