कालच्या निकालाबद्दल जनतेच्या मनातही प्रश्न, काँग्रेस नेते नाना पटोले यांचे विधान

कालच्या निकालाबद्दल जनतेच्या मनातही प्रश्न, काँग्रेस नेते नाना पटोले यांचे विधान

काल जो निकाल लागला त्याचे आम्हालाही आश्चर्य आहे, पण जनतेच्या मनातही प्रश्न आहेत असे विधान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केले आहे. तसेच याबाबत आम्ही दिल्लीत जाऊन हायकमांडशी चर्चा करू असेही पटोले म्हणले.

आज माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, सोशल मिडियावर लोक म्हणत आहेत की हे जनतेचं सरकार नाही. लोकांमध्ये ही जनभावना निर्माण झाली आहे. लोकशाहीमध्ये जनता ही सर्वात महत्त्वाची असते. हे जनतेच्या मतांच सरकार नाही, असे जर खुद्द जनता म्हणत असेल तर कुठे ना कुठे तरी दाल मे काला है. त्यामुळे यासंदर्भात हायकमांडशी चर्चा करावी त्यासाठी मी दिल्लीला चाललोय. कालच्या निकालावर महाविकास आघाडीचे नेतेही चर्चा करतील. राज्यातला निकाल हा धक्कादायक आहे, राजकीय पक्ष म्हणून आम्हाला आश्चर्य आहेच पण सर्वसामान्यांनाही प्रश्न पडला आहे. भाजपचे हायकमांड पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सभांना गर्दी होत नव्हती तरी त्यांना मतं कशी मिळाली हा प्रश्न लोकांना पडला आहे असेही पटोले म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;