लेबनॉनमध्ये इस्रायली लष्कराकडून हवाई हल्ला सुरूच, 48 तासांत 120 जणांचा मृत्यू

लेबनॉनमध्ये इस्रायली लष्कराकडून हवाई हल्ला सुरूच, 48 तासांत 120 जणांचा मृत्यू

लेबनॉनमध्ये इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात जोरदार हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यात गेल्या 48 तासांत येथे 120 जणांचा मृत्यू झाला आहे. लेबनॉनच्या सिव्हिल डिफेन्स ऑर्गनायझेशननेही याला दुजोरा दिला आहे. इस्रायलने बेरूतमधील बस्ता परिसरात शनिवारी सकाळी केलेल्या हल्ल्यात 11 लोक ठार झाले आणि डझनभर जखमी झाले.

इस्त्रायलने बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगरातील हदत आणि चौईफामध्येही मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले. याशिवाय टायर शहराच्या समुद्रकिनाऱ्यावर इस्रायलने केलेल्या ड्रोन हल्ल्यात दोन मच्छिमारांचा मृत्यू झाला. गेल्या एका आठवड्यात बेरूतवर किमान चार मोठे हल्ले केले आहेत. अमेरिकेचे राजदूत अमोस हॉचस्टीन युद्धविरामासाठी या भागाच्या दौऱ्यावर असतानाच हे हल्ले करण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;