IND vs AUS – यशस्वी जयस्वालची रेकॉर्डतोड कामगिरी, गौतम गंभीरचे 16 वर्षांचे विक्रम मोडला

IND vs AUS – यशस्वी जयस्वालची रेकॉर्डतोड कामगिरी,  गौतम गंभीरचे 16 वर्षांचे विक्रम मोडला

टीम इंडियाचा  स्टार सलामीवीर यशस्वी जयस्वाल आपल्या धमाकेदार खेळीने यंदा रेकॉर्ड केले आहे. ऑस्ट्रेलियासोबत सुरु असलेल्या पर्थ टेस्टच्या तिसऱ्या दिवशी शतक झळकावत प्रशिक्षक गौतम गंभीर याचा 16 वर्षांचा रेकॉर्ड तोडला आहे. तो आता टेस्ट क्रिकेटमध्ये वर्षभरता सर्वात जास्त धावा करणारा हिंदुस्थानी डावखुरा फलंदाज बनला आहे.

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या नावावर 16 वर्ष हा रेकॉर्ड होता. 2008 मध्ये गंभीरने 8 टेस्ट सामन्यांमध्ये 1134 धावा काढल्या होत्या आणि तो वर्षातला पाचवा सगळ्यात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला होता. गंभीरने 70.87 च्या सरासरीने फलंदाजी केली होती. त्यात 3 शतकं आणि 6 अर्धशतकं केली. 2008 मध्ये त्याने चांगली कामगिरी उत्कृष्ट होती आणि गंभीर व्यतिरिक्त, वीरेंद्र सेहवाग (1462 धावांसह दुसरे स्थान), व्हीव्हीएस लक्ष्मण (1086 धावांसह सहावे स्थान) आणि सचिन तेंडुलकर (1063 धावांसह नववे स्थान) हे देखील आघाडीच्या फलंदाजांमध्ये होते. वर्षातील टॉप 10 फलंदाजांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले होते. या वर्षात म्हणजेच 2024 मध्ये 1209 धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत यशस्वी दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;