राज्यात कुणाचंही सरकार येवो… इथं मात्र फक्त छावा सरकार!
‘कलर्स मराठी’ वरील ‘#लय आवडतेस तू मला’ ही मालिका काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सरकार-सानिकाच्या जोडीवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. अशातच मालिकेत आता एक वेगळाच ट्विस्ट येणार आहे. कळशीचा छावा अर्थात सरकार हळूहळू साखरगावच्या सानिकाच्या प्रेमात पडू लागला असून आता मालिकेत आणखी एक रंजक ट्वि्स्ट येणार आहे. कळशीचा छावा सरकार बनणार साखरगावच्या सानिकाचा बॉडीगार्ड!, त्यामुळे या मालिकेत आता मोठा ट्विस्ट आला आहे.
सरकार बनणार बॉडीगार्ड
सरकार साखरगावात सानिकाचा बॉडीगार्ड म्हणून एन्ट्री घेणार आहे. रांगडा गडी सरकारच्या बॉडीगार्ड लूकचीही सोशल मीडियावर चांगलीच हवा आहे. मालिकेत सरकारने आपली खरी ओळख मात्र सर्वांपासून लपवून ठेवली आहे. आणि तो राजा या नावाने साहेबरावांच्या घरात प्रवेश करणार आहे. सरकारसमोर दोन मोठे आव्हान आहेत. एक तो कळशीचा आहे आणि दुसरं आप्पांचा मुलगा असल्याचं साखरगावात कोणाला कळता कामा नये. नाहीतर साहेबराव त्याचा जीव घ्यायलाही कमी करणार नाही.
मालिकेतील नव्या ट्रॅकबद्दल तन्मय काय म्हणाला?
‘#लय आवडतेस तू मला’ या मालिकेतील सरकार म्हणजेच अभिनेता तन्मय जक्का याने मालिकेतील नव्या ट्रॅकवर प्रतिक्रिया दिली आहे. आतापर्यंत प्रेक्षकांनी सरकार जसा पाहिलाय त्याच्या अगदी विरुद्ध आता तो दिसणार आहे. ‘बॉडीगार्ड’ चित्रपटातील सलमान खानच्या पात्रासोबत खूप मिळतंजुळतं पात्र आता मी साकारणार आहे. सरकार हे आधीचं पात्र खूप बिनधास्त होतं. तो त्याच्या टर्मवर जगणारा होता. पण आता त्याला साहेबरावच्या घरी जाऊन एका मर्यादेत राहून नोकरी करावी लागणार आहे. अनेकांच्या नजरा असलेल्या घरात राहावं लागणार आहे. या नजरांमधून वाचून त्याला अनेक गोष्टी साध्य करायच्या आहेत, असं तन्मयने म्हटलं आहे.
ज्यात आप्पांसाठी नवीन घर बांधायचं त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला ही नोकरी करून पैसे जमवायचे आहेत. सरकार या गोष्टी कशा साध्य करणार, यात तो सानिकाचं मन कसं जिंकणार? आणि सानिकाला सत्य कळणार का? हे बघणं उत्सुकतेचं असणार आहे. मालिकेतील राजाला पाहून तुम्हाला नक्कीच बॉडीगार्ड मधल्या लव्हली सिंहची म्हणजेच सलमान खानची आठवण येईल, असं तन्मयने म्हटलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List