माता न तू वैरिणी! लग्नात अडथळा ठरणाऱ्या पाच वर्षांच्या मुलीची आईने केली गळा आवळून हत्या

माता न तू वैरिणी! लग्नात अडथळा ठरणाऱ्या पाच वर्षांच्या मुलीची आईने केली गळा आवळून हत्या

दिल्लीच्या अशोक विहारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमात मुलगी अडथळा ठरत असल्याने एका जन्मदात्या आईने आपल्या पाच वर्षांच्या मुलीची गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना चंद बंघू रुग्णालयातून समोर आली असून पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची मैत्री इंस्टाग्रामवरुन राहुल नावाच्या एका व्यक्तीशी झाली होती. त्यानंतर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. महिला त्याच्याशी लग्न करु इच्छित होती. मात्र जेव्हा राहुल आणि त्याच्या कुटुंबियांनी महिलेच्या मुलीला स्विकारण्यास नकार देत लग्न मोडले. त्यामुळे निराश झालेल्या महिलेने मुलीचा गळा आवळून हत्या केली.

मुलीचा मृतदेहाची तपासणी केली असता तिच्या गळ्याजवळ व्रण दिसले. त्यानंतर पोलिसांनी महिला आणि तिच्या कुटुंबियांची चौकशी केली. कसून चौकशी केली असता महिलेने तिचा गुन्हा मान्य केला. ती म्हणाली, तिच्या पहिल्या पतीने तिला सोडून दिले होते. त्यानंतर ती इंस्टाग्रामच्या माध्यमातून राहुलच्या प्रेमात पडली. लग्नही दोघं करणार होते. मात्र तिला पाच वर्षांची मुलगी असल्यामुळे त्याने लग्नास नकार दिला.

महिला दिल्लीला राहुलकडे येण्यापूर्वी हिमाचल प्रदेशमध्ये एका नातेवाईकाकडे गेली होती. त्याच दरम्यान नातेवाईकाने तिच्या मुलीचे लैगींक शोषण केले होते. ही घटना पोलीस तपासात समोर आली. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. याप्रकरणी 302, 376, 6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे. शिवाय लैंगीक छळ केलेल्या नातेवाईकालाही अटक करण्यासाठी गेले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;