वसई, नालासोपारा, बोईसरमध्ये बविआला धक्का
वसई व नालासोपाऱ्यातील राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःचा दबदबा निर्माण केलेले बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार हितेंद्र ठाकूर व त्यांचा मुलगा क्षितिज ठाकूर यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
वसईतून सातव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले हितेंद्र ठाकूर यांना 74 हजार 400 एवढी मते मिळाली. त्यांच्याविरोधात भाजपच्या स्नेहा दुबे 77 हजार 553 मतांनी निवडून आल्या.
नालासोपाऱ्यात चौथ्यांदा निवडणूक लढवणारे क्षितिज ठाकूर यावेळची बाजी हरले असून त्यांना 1 लाख 65 हजार 113 मते मिळाली, तर भाजपचे राजन नाईक हे येथून 36 हजार 77 मतांनी निवडून आले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List