पुणे पोर्शे प्रकरणाशी संबंधित अजित पवार गटाचे नेते सुनील टिंगरे वडगाव शेरीतून पराभूत

पुणे पोर्शे प्रकरणाशी संबंधित अजित पवार गटाचे नेते सुनील टिंगरे वडगाव शेरीतून पराभूत

पुणे पोर्श प्रकरणाशी संबंधित असलेले अजित पवार गटाचे उमेदवार सुनील टिंगरे वडगाव शेरीमधून पराभूत झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी 4,710 मतांची आघाडी घेत टिंगरे यांचा पराभव केला. टिंगरे हे वडगाव शेरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते.

पोर्शे अपघात प्रकरणात टिंगरे यांचेही नाव पुढे आले होते. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये 19 मे 2024 रोजी 17 वर्षीय पोर्शे कार चालकाने दोन दुचाकींना धडक दिली होती. यात दोघांचाही मृत्यू झाला. घटनेनंतर अल्पवयीन मुलगा आणि चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यानंतर सुनील टिंगरे यांनी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. टिंगरे यांनी अल्पवयीन आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. पोलिसांनी याप्रकरणी टिंगरे यांची चौकशीही केली होती. मात्र टिंगरे यांनी हे आरोप फेटाळले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;