राज्याचा निकाल महायुतीसाठीही धक्कादायक, काँग्रेस नेते अमित देशमुख यांचे मत

राज्याचा निकाल महायुतीसाठीही धक्कादायक, काँग्रेस नेते अमित देशमुख यांचे मत

राज्याचा निकाल हा फक्त महाविकास आघाडीसाठीच नव्हे तर महायुतीसाठीही धक्कादायक आहे असे विधान काँग्रेस नेते आणि लातूर शहरचे आमदार अमित देशमुख यांनी केले आहे. तसेच लाडकी बहीण योजनेमुळे फरक पडला असे प्रथमदर्शनी दिसत आहे असेही देशमुख म्हणाले.

माध्यमांशी बोलताना देशमुख म्हणाले की, महाराष्ट्राचा निकाल हा फक्त महाविकास आघाडीसाठीच नाही तर महायुतीसाठीही धक्कादायक आहे. असे आकडे अभिप्रेत नव्हते. महायुतीला सव्वा दोनशे जागा मिळाल्या आहेत. हे आकलनापलीकडे आहेत. ही संपूर्ण निवडणूक अटीतटीची झाली आहे. लातूर ग्रामीणमध्येही अटीतटीची निवडणूक झाली आणि आमचा पराभव झाला. त्याची कारणं आम्ही शोधू. यातून आम्ही नाऊमेद होणार नाही. आम्ही काम करत राहू. लाडकी बहीण योजनेचा परिणाम झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे असे देशमुख यांनी नमूद केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;