ट्रम्प यांच्या विजयानंतर मस्क यांची कमाई वाढली

ट्रम्प यांच्या विजयानंतर मस्क यांची कमाई वाढली

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प जिंकल्यानंतर ‘एक्स’चे मालक एलन मस्क यांना चांगलाच फायदा झाला आहे. ट्रम्प यांच्या विजयानंतर एलन मस्क यांची नेटवर्थ 70 अब्ज डॉलरने वाढली आहे.  टेस्लाचा स्टॉक गगनाला भिडत आहे. त्यांची एआय कंपनी ‘एक्सएआय’देखील गगनाला भिडत आहे. त्यांच्या वाढत्या राजकीय प्रभावामुळे अनेक कंपन्यांसह अब्जाधीशांची एकूण संपत्ती वाढत आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, 22 नोव्हेंबरच्या अहवालात मस्क यांची एकूण संपत्ती 340 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे.

5 नोव्हेंबरनंतर नशीब बदलले

5 नोव्हेंबर रोजी झालेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत गुंतवणूकदारांनी एलन मस्क यांच्यावर विश्वास व्यक्त केला आणि टेस्लाच्या शेअरच्या किमतीत 40 टक्के वाढ झाली. मस्क यांची एकूण संपत्ती विक्रमी 321.7 अब्ज डॉलर्सवर पोहोचली, जी 3.5 वर्षांतील सर्वोच्च पातळी आहे. त्यांची संपत्ती  347.8 अब्ज डॉलर आहे.

मस्क यांच्या एआय कंपनीची भरारी

मस्क यांच्या एआय कंपनीचे मूल्य दुप्पट होऊन 50 अब्ज डॉलर झाले. मस्क यांच्या कंपनीतील 60 टक्के भागीदारीमुळे त्यांच्या संपत्तीत आणखी  13 डॉलरची अब्जची भर पडली आहे. निवडणुकीनंतर या कंपनीत 70 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;