मजुराला खाणीत सापडला 20 लाखांचा हिरा
भोपाळमध्ये खाणीत काम करताना एका मजुराचे नशीब फळफळले आहे. भोपाळमधील पन्ना येथे एक हिरा सापडला असून तो 5.87 कॅरेटचा आहे. या हिऱ्याची किंमत जवळपास 20 लाख रुपये इतकी आहे. हा हिरा सापडल्याची माहिती मिळताच याला पन्ना येथील हिरे कार्यालयात जमा करण्यात आले आहे. या हिऱ्याला येत्या 4 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या लिलावात बोली लावण्यासाठी ठेवले जाणार आहे. भोपाळमधील पन्ना हे देशात आणि जगात उच्च दर्जाच्या हिऱ्यांसाठी ओळखले जाते. ज्या मजुराला हा हिरा मिळाला आहे त्या मजुराचे नाव सुरेंद्र सिंह गौर असे आहे. हा हिरा लिलावात विक्री केल्यानंतर मिळालेल्या रकमेतून 11.50 टक्के रॉयल्टी कापून उर्वरित रक्कम सुरेंद्र सिंह गौर यांना दिली जाणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List