दिलजीत दोसांझच्या कार्यक्रमाची तिकिटे अवघ्या 50 सेकंदांत संपली

दिलजीत दोसांझच्या कार्यक्रमाची तिकिटे अवघ्या 50 सेकंदांत संपली

गायक-अभिनेता दिलजीत दोसांझची मुंबईत 19 डिसेंबर रोजी कॉन्सर्ट होणार आहे. 22 नोव्हेंबरपासून या कार्यक्रमाच्या तिकिटांचे बुकिंग सुरू झाले. त्याला भन्नाट प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाची तिकीट अवघ्या 50 सेकंदांत विकली गेली. त्यामुळे दिलजीतच्या अनेक चाहत्यांना तिकिटांपासून वंचित रहावे लागले.

गेल्या काही दिवसांपासून दिलजीतच्या ‘दिल-लुमिनाती’ दौऱ्याची चर्चा आहे. या दौऱ्यात मुंबई शहराचाही समावेश आहे. ‘मुंबईसारखे कुठले शहर नाही. स्वप्नांचे शहर. जादुई शहर. दिल-लुमिनातीचा अनुभव मुंबईतील चाहत्यांसाठी घेऊन येण्याचा आनंद आहे’ अशी घोषणा काही दिवसांपूर्वी दिलजीत दोसांझने केली होती. दिलजीतच्या मुंबईतील चाहत्यांमध्ये या कार्यक्रमाची उत्कंठा आहे. कार्यक्रमाच्या सिल्व्हर कॅटेगिरीतील तिकिटांची किंमत 4999 रुपये आहे. ही तिकीट 50 सेकंदांच्या आता विकली गेली. गोल्ट कॅटेगिरीची तिकिटेही क्षणात विकली गेली. वरच्या श्रेणीतील तिकिटांची किंमत रुपये 21,999 आणि 60 हजार रुपये इतकी आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;