दिल्ली पुन्हा बनली गॅस चेंबर
दिल्ली पुन्हा गॅस चेंबर बनली आहे. शनिवारी सायंकाळी दिल्लीतील 9 भागात प्रदूषण गंभीर श्रेणीत नोंदवले गेले. केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या म्हणण्यानुसार वजीरपूर आणि दिल्ली शहरातील हवा सर्वात विषारी आहे. येथे एक्युआय तब्बल 467 इतका नोंदवला गेला. त्याचवेळी दिल्लीचा सरासरी एक्युआय 419 नोंदवला गेला. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी दिल्लीच्या मुख्य सचिवांना वाढत्या प्रदूषणाबाबत पत्र लिहून जीआरएपी-4 च्या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List