महाराष्ट्राची जनता हा निकाल कधीच मान्य करणार नाही – रमेश चेन्निथला

महाराष्ट्राची जनता हा निकाल कधीच मान्य करणार नाही – रमेश चेन्निथला

महाराष्ट्राची जनता हा निकाल कधीच मान्य करणार नाही, असं काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला म्हणाले आहेत. आज मुंबईत काँग्रेसची पत्रकार परिषद पार पडली. याच पत्रकार परिषदेत राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर बोलताना चेन्निथला असं म्हणाले.

रमेश चेन्निथला म्हणाले की, ”हा निकाल अविश्वसनीय आहेत. आम्ही तळागाळातील कार्यकर्ते, नेते आणि पत्रकारांशी संवाद साधला आहे. कोणीही अशा परिणाम येऊ शकतात, असं सांगितलेलं नाही. महाविकास आघाडी आणि महायुतीत टक्कर होईल, असं अनेकांनी सांगितलं. मात्र आज जे परिणाम आले आहेत, त्यावर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि आजचे निकाल यात 5 महिन्यात इतका बदल कसा होऊ शकतो, हे शक्य नाही. बेरोजगारी, महागाई आणि विद्यमान सरकारचे भ्रष्टाचार, असे अनेक मुद्दे समोर आहेत. फक्त लाडकी बहीण योजनेने हे मुद्दे संपले का? म्हणून आम्हाला या निकालांवर विश्वास नाही.”

”हे परिणाम अविश्वसनीय आणि अनपेक्षित आहेत. आम्ही याच्याबद्दल अधिक तपास करू. आमचे कार्यकर्ते आणि नेते हैराण झाले आहेत, कोणालाच विश्वास बसत नाही आहे की, हे नेमकं काय झालं. महाराष्ट्रातील जे सहा विभाग आहेत, तिथे असे काही नेते आहेत, ज्यांचा विजय निश्चित होता, त्यांचाही पराभव झाला आहे. काही जिल्हे असे आहेत, जिथे आमची एकही जागा निवडून आली नाही”, असंही ते म्हणाले.

”महाविकास आघाडीच्या 100 टक्के जिंकणाऱ्या उमेदवारांचाही पराभव झाला आहे. आम्ही याचा खोल तपास करू, आम्ही जनतेसमोर जाऊ. आमचा महाराष्ट्राच्या जनतेवर विश्वास आहे. महाराष्ट्राची जनता हा निकाल कधीच मान्य करणार नाही”, असं रमेश चेन्निथला म्हणाले.

”आमचे सलग आठ वेळा निवडणूक जिंकणारे बाळासाहेब थोरात यांचाही पराभव झाला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचाही पराभव झाला. म्हणून मला या निवडणुकीवर शंका आहे. आम्ही निकालांचा अभ्यास करू आणि जनतेसमोर येऊ. हा निकाल महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावनेनुसार नाही”, असं चेन्निथला म्हणाले.

”मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा सकाळी 10 पर्यंत आम्ही 150 चा आकडा गाठला होता. यानंतर निकाल उलटला. यासाठी आम्हाला डेटा पाहावा लागेल”, असं मतमोजणीवर प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;