Maharashtra Assembly Election – खेड-आळंदी मतदारसंघातून शिवसेनेच्या बाबाजी काळे यांचा दणदणीत विजय
खेड-आळंदी मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार बाबाजी काळे यांचा दणदणीत विजय झाला आहे. बाबाजी काळे यांचा एकूण 1 लाख 50 हजार 152 मतांनी विजय झाला असून त्यांनी अजित पवार गटाच्या दिलीप पाटील यांचा 51,743 मतांनी पराभव केला आहे.
खेड-आळंदी मतदारसंघातून बाबाजी काळे यांच्या व्यतिरिक्त अजित पवार गटाचे दिलीप पाटील, वंचीत बहुजन आघाडीचे रविंद्र रनधावे आणि इतर अपक्ष उमेदवारांचा समावेश होता. एकून 13 उमेदवार खेड-आळंदी मतदारसंघातून रिंगणात उतरले होते. मात्र, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे बाबाजी काळे यांनी दणदणीत विजय साजरा केला. बाबाजी काळे यांच्या विजयानंर शिवसैनिकांनी जोरदार जल्लोष केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List