‘या नात्यात खूप वेदना होत्या’; घटस्फोटावर सायरा बानो यांची भावनिक पोस्ट

‘या नात्यात खूप वेदना होत्या’; घटस्फोटावर सायरा बानो यांची भावनिक पोस्ट

AR Rahman divorce: ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान आणि त्यांच्या पत्नी सायरा बानो यांनी लग्नाच्या 29 वर्षानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. अचानक आलेल्या या बातमीमुळे अनेक चर्चा आणि तर्क-वितर्क काढण्यात आले. पण सायरा बानो यांनी यांच स्पष्टिकरण देत घटस्फोटाचे कारण समोर आणलं आहे.

सायरा बानो म्हणाल्या,” या नात्यात खूप वेदना”

सायरा बानो यांच्या म्हणण्यानुसार, या नात्यात तिला खूप वेदना होत होत्या, जे सांभाळणे तिच्यासाठी खूप कठीण झालं होतं. एआर रहमानच्या चाहत्यांसाठी ही बातमी धक्क्यापेक्षा कमी नव्हती. प्रेस रिलीजनुसार, जोडप्याचा विभक्त होण्याचा निर्णय हा अचानक घेतलेला निर्णय नाही. बराच विचार करून घेतल्याचे सायरा यांनी म्हटलं. सायराने प्रेस रिलीजमध्ये म्हटलंय की, ‘ती आता हे नातं वाचवू शकत नाही.’

प्रेस रिलीजमध्ये लिहिल्या प्रमाणे, ‘लग्नाच्या अनेक वर्षानंतर सायरा यांनी त्यांचे पती ए.आर. रहमानपासून वेगळे होण्याचा कठीण निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या नातेसंबंधातील महत्त्वपूर्ण भावनिक तणावानंतर घेतला आहे. एकमेकांवर त्यांचं नितांत प्रेम असूनही, या जोडप्याला असं आढळून आलंय की तणाव आणि अडचणींमुळे त्यांच्यात एक दरी निर्माण झाली आहे जी यावेळी दोन्ही पक्षांनी भरून काढता आलेली नाही. सायरा यांनी वेदना आणि त्रासामुळे हा निर्णय घेतल्याचे आवर्जून सांगितलं. सायरा या आव्हानात्मक काळात लोकांकडून गोपनीयतेची आणि समजून घेण्याची विनंती करते, कारण ती तिच्या आयुष्यातील या कठीण अध्यायातून जात आहे. या जोडप्याला तीन मुलं आहेत’

 

रहमानने 1989 मध्ये इस्लाम धर्म स्वीकारला

एआर रहमान आणि सायरा यांचा विवाह 1995 मध्ये झाला होता. या जोडप्याला तीन मुलं असून त्यांची नावं खतिजा, रहीमा, आमेन अशी आहे. संगीतकाराने सांगितलं होते की हे नातं त्याच्या आईने ठरवले होतं. दोघांमध्ये बरेच सांस्कृतिक फरक होते पण तरीही ते आपलं नातं चांगले जपत होते. सिमी ग्रेवालला दिलेल्या मुलाखतीत रहमानने सांगितलं होतं की, खरं सांगायचं तर माझ्याकडे वधू शोधण्यासाठी वेळ नव्हता. पण, माझ्यासाठी लग्न करण्याची हीच योग्य वेळ आहे हे मला माहीत होतं. मी 29 वर्षांचा होतो आणि मी माझ्या आईला म्हणालो, ‘मला वधू शोध.’

दरम्यान रहमानने 1989 मध्ये इस्लाम धर्म स्वीकारला. त्यांनी दिलीप कुमार या नावावरून अल्लाह राखा रहमान असं नाव बदललं. रेहमानची पत्नी सायरा बानो या अभिनेता रशीन रहमानच्या नातेवाईक आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;