अभिनेते ऋषी कपूर यांच्या त्या शेवटच्या इच्छांचं काय झाल? लेक रिद्धिमाने केला खुलासा
अभिनेते ऋषी कपूर यांच्या शेवटच्या इच्छा कोणत्या होत्या आणि त्या पूर्ण झाल्या की नाही याबद्दल त्यांची लेक रिद्धिमा कपूरने एका मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांनी 30 एप्रिल 2020 मध्ये जगाचा निरोप घेतला. पण आजही त्यांच कुटुंबिय त्यांचे किस्से, आठवणी शेअर करताना दिसतात. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी नीतू कपूर, मुलगा रणबीर कपूर आणि मुलगी रिद्धिमा कपूर अनेकदा त्यांच्याबद्दल बोलताना दिसतात.
दरम्यान एका मुलाखती दरम्यान ऋषी कपूर यांची लेक रिद्धिमा कपूर हीने वडिलांच्या शेवटच्या इच्छा कोणत्या होत्या याबद्दल सांगितलं. रिद्धिमाने सांगितलं की त्यांना रणबीरचे लग्न पाहायचे होते.
तसेच एका शोदरम्यान ऋषी कपूर यांच्या शेवटच्या इच्छेबद्दल सांगताना नीतू सिंह-कपूरही म्हणाल्या होत्या की, रणबीरचे लग्न ऋषी यांना पाहायचे हेते. मात्र त्याधीच त्यांचे निधन झाल्याने त्यांची शेवटची इच्छा अपूर्णच राहिली. रणबीरने लग्न झालेलं पाहून ऋषीजी आता जिथे कुठे असतील, तिथून ते खुश होत असतील.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.







Comment List