अजय चौधरी यांची हॅट्रिक, शिवडीतून दणदणीत विजय

अजय चौधरी यांची हॅट्रिक, शिवडीतून दणदणीत विजय

शिवडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अजय चौधरी विजयी झाले आहेत. त्यांनी 7140 एवढ्या मताधिक्क्याने विजय मिळवला आहे. या मतदारसंघातून अजय चौधरी यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. त्यांना विजय घोषित केल्यानंतर शिवडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

अजय चौधरी यांनी मनसेचे बाळा नांदगावकर यांचा पराभव केला. अजय चौधरी यांना 74890 मते पडली. तर बाळा नांदगावकर यांना 67750 मते मिळाली. तर तिसऱ्या क्रमांकांची सर्वाधिक मते अपक्ष उमेदवार संजय आंबोळे यांना मिळाली. त्यांना 5925 मते मिळाली.

शिवडी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना अजय चौधरी म्हणाले की, ”आपली शिवडी विधानसभा म्हणजे निष्ठावंतांची शिवडी.. काळाने आपली परीक्षा घेतली पण काळापुढे आपली निष्ठाच जिंकली. आजचा हा सलग तिसरा विजय तुमच्याशिवाय शक्यच नव्हता. एक सकारात्मक ऊर्जा आणि निष्ठावंत शिवसैनिकांचं मजबूत संघटन भक्कमपणे उभं राहिलं, म्हणून सलग तिसऱ्यांदा आपल्या विधानसभेत निष्ठेचा विजय झाला. तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलंय… होय, ही निष्ठावंत शिवसैनिकांची शिवडी.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;