लागलेला निकाल अनपेक्षित, हे मतदान महाराष्ट्राने केलं आहे की EVM ने? आदित्य ठाकरे यांचा सवाल

लागलेला निकाल अनपेक्षित, हे मतदान महाराष्ट्राने केलं आहे की EVM ने? आदित्य ठाकरे यांचा सवाल

राज्यात लागलेला निकाल अनपेक्षित होता अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. तसेच राज्यात झालेले मतदान महाराष्ट्राने केले आहे की ईव्हीएमने केले असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, हे मतदान महाराष्ट्राने केले आहे की ईव्हीएमने केले आहे हा प्रश्नच आहे. यावर आम्ही चर्चा करूच. लोकसभेत महाराष्ट्राने आम्हाला आशिर्वाद दिला होता. पण विधानसभेत तो आम्हाला मिळाला नाही याचा आम्ही जरूर विचार करू. असे असले तरी यात ईव्हीएम किती प्रचार केला याचाही विचार करू. लागलेला निकाल आजच्यासारखा अपेक्षित नव्हता. यातील तांत्रिक गोष्टींवर आम्ही चर्चा करू असेही आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच पुन्हा जिंकू असेही असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;