जोगेश्वरीत शिवसेनेच्या वाघानं विजय खेचून आणला, ‘निष्ठावान’ बाळा नर यांची मनीषा वायकर यांच्यावर मात

जोगेश्वरीत शिवसेनेच्या वाघानं विजय खेचून आणला, ‘निष्ठावान’ बाळा नर यांची मनीषा वायकर यांच्यावर मात

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अनंत (बाळा) नर यांनी विजय खेचून आणला. ‘निष्ठावान शिवसैनिक’ अशी ओळख असलेल्या अनंत (बाळा) नर यांनी मनीषा वायकर यांच्यावर मात करत शिवसेनेचा भगवा फडकवला.

जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाने अनेक वर्षे शिवसेनेलाच साथ दिली आहे. गद्दारीनंतरही जोगेश्वरीकरांनी निष्ठावान शिवसैनिक अनंत (बाळा) नर यांना विधानसभेत पाठवले. चुरशीच्या लढतीत अनंत (बाळा) नर यांनी 1,522 मतांनी विजय मिळवला.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जोगेश्वरीमधून शिवसेनेला मताधिक्य मिळाले होते. नर यांनी नगरसेवकपदाच्या कारकीर्दीत प्रत्येक विभागातील नागरी कामांना प्राधान्य दिले. याचाही फायदा त्यांना झाला. त्यांना 76,615 मते, तर मनीषा वायकर यांना 75,093 मते मिळाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;