अनाकलनीय निकाल, हे अचानक घडले आहे का? आम्हाला EVM वर संशय; भाई जगतापांचं मोठं विधान
राज्यात आमचा पराभव झाला आहे तो आम्ही स्विकारतो असे विधान काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केले आहे. तसेच हा निकाल अनाकलनीय आहे आणि आम्हाला ईव्हीएमवर संशय आहे असेही जगताप म्हणाले.
एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना भाई जगताम म्हणाले की, या निकालाचे मी स्वागत करतो, काँग्रेस पक्ष म्हणून मी हा पराभव स्विकारतो. पण हा अनाकलनीय निकाल आहे. ज्याचे आकलन ना माध्यमांना झाले ना सर्वसामान्यांना. राजकीय धुरीणांनाही या निकालाचे आकलन झाले नाही. हे अचानक घडले आहे का याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. किरीट सोमय्या यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला होता. आणि मी सत्तेत असताना या गोष्टीला दुजोरा दिला होता. कुठली शंका निर्माण होत असेल तर लोकशाहीत त्याचे निराकारण झाले पाहिजे. दुर्दैवाने ते झाले नाही. आम्हाला ईव्हीएमवर संशय आहे असेही जगताप म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List