‘शाका लाका बूम बूम’ फेम अभिनेत्याने मराठी प्रथानुसार उरकलं लग्न, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

‘शाका लाका बूम बूम’ फेम अभिनेत्याने मराठी प्रथानुसार उरकलं लग्न, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Shaka Laka Boom Boom: ‘शाका लाका बूम बूम’ फेम संजूने त्यांच्या मॅजिक पेन्सिलने 90 च्या दशकातील मुलांचं बालपण आणखी खास केलं. आता अभिनेत्याला ओळखणं देखील कठीण झालं आहे. मालिकेत संजू ही भूमिका साकारणारा अभिनेता किंशुक वैद्य विवाहबंधनात अडकला आहे. अभिनेत्याने गर्लफ्रेंड दीक्षा नागपाल हिच्यासोबत लग्न केलं आहे. लग्नाच्या कपड्यांमधील दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. दोघांच्या लग्नात सुमेध मुदगलकर, हिमांशु सोनी, हिबा नवाब, शाहीर शेख यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

किंशुक वैद्य आणि दीक्षा नागपाल पारंपरिक कपड्यांमध्ये आकर्षित दिसत आहेत. महाराष्ट्रीयन नवरीच्या रुपात दीक्षा प्रचंड सुंदर दिसत आहे. किंशुक आणि दीक्षा यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडीओमध्ये किंशुक मित्रांसोबत वरातीत दमदार डान्स करताना दिसत आहे.

 

 

‘राधाकृष्ण’ फेम अभिनेता सुमेध मुदगलकर याने इन्स्टाग्रामवर किंशुक आणि दीक्षा यांच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. लग्नात अभिनेत्याचे मित्र आणि पाहुणेमंडळी आनंद लुटताना दिसत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त किंशुक याच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. सुमेध याने लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘लग्नाचे सीन हे वेडे सीन आहेत…’ असं लिहिलं आहे.

किंकूश याच्या पत्नीबद्दल सांगायचं झालं तर, तिचं नाव दीक्षा नागपाल असं असून ती एक कोरिओग्राफर आहे. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. आता चाहते ‘शाका लाका बूम बूम’ फेम किंशुक वैद्य याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

सांगायचं झालं तर, दिक्षा हिच्याआधी अभिनेत्याने शिव्या पठानिया हिला देखील डेट केलं आहे. अनेक वर्ष दोघे रिलेशनशिपमध्ये होते. पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर दीक्षा हिला अनेक वर्ष डेट केल्यानंतर अभिनेत्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला. सध्या सर्वत्र किंशुक वैद्य आणि दीक्षा नागपाल यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;