कुछ तो गडबड है! या निकालामागे खूप मोठं कारस्थान; हा जनतेचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा निकाल नाही – संजय राऊत
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलांनुसार महायुतीला जास्त जागा मिळत असल्याचे समोर येत आहे. या निकालावर बोलत असताना शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी ”काहीतरी गडबड” असल्याचे म्हटले आहे. ”महाराष्ट्राचं वातावरण, कल ज्या बाजूने होता, तसा हा निकाल नाही. जे निकाल यांनी लावून घेतले आहेत. त्या लावून घेतलेल्या निकालावर माझ्यासारख्या लोकशाही मानणाऱ्या माणसाचा विश्वास नाही. हा कौल कसा मानावा हा जनतेला देखील प्रश्न पडला असेल”, असे संजय राऊत म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List