मराठी इंडस्ट्रीनंतर बॉलिवूड गाजवणारी अमृता खानविलकर इतक्या कोटींची मालकीण
अभिनेत्री अमृता खानविलकर फक्त अभिनयातूनच नाही तर, दमदार नृत्य आणि सौंदर्याच्या जोरावर देखील चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.
अमृताने फक्त सिनेमांमध्ये नाही तर, रिऍलिटी शोमध्ये देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रिॲलिटी शो फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 10 आणि झलक दिखला जा 10 या डान्स शोमध्ये अमृता मोठ्या झळकली होती. ज्यामुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत अधिक वाढ झाली.
रिपोर्टनुसार, 'खतरों के खिलाडी' शोसाठी अमृताचं मानधन प्रति एपिसोड 1.5 लाख रुपये होती. तर 'झलक दिखला जा 10' शोमध्ये सहभागी झाल्याबद्दल अभिनेत्रीला 10 लाख रुपये मिळाले होते... अशी माहिती देखील समोर आली.
अमृता खानविलकरच्या मनधनाबद्दल सांगायचं झालं तर, रिपोर्टनुसार, अभिनेत्री एका सिनेमासाठी 10 ते 12 कोटी रुपये घेते. अभिनेत्रीकडे 50 कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List