वांद्रे-मडगाव एक्प्रेसला प्रवाशांचाच ‘ब्रेक’, थांबे वगळल्याने संख्या रोडावली

वांद्रे-मडगाव एक्प्रेसला प्रवाशांचाच ‘ब्रेक’, थांबे वगळल्याने संख्या रोडावली

कोकण मार्गावर आठवडय़ातून दोन वेळा चालवण्यात येत असलेल्या वांद्रेमडगाव साप्ताहिक गाडीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने प्रवासी संख्या रोडावली आहे. कोकण मार्गावरील महत्त्वाच्या स्थानकांवरील थांबे वगळण्यात आल्याचा मोठा फटका रेल्वे प्रशासनाला बसत आहे. खेड स्थानकातही थांबा देण्यात आलेला नाही. यामुळे प्रवासी संख्या घटली असून कोकण मार्गावर महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे द्यावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरून कोकणात धावणारी एकही गाडी नव्हती. कोकणवासीयांना गाव गाठण्यासाठी सीएसएमटी-मुंबई पिंवा दादर स्थानकांचा आधार घ्यावा लागत होता. विशेषतः सणांच्या कालावधीत कोकणवासीयांना यातायात करावी लागत होती. या पार्श्वभूमीवर पश्चिम मार्गावरून कोकण मार्गावर गाडी चालवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येत होती. सततच्या पाठपुराव्यानंतर 29 ऑगस्टपासून वांद्रे-मडगाव द्वि-साप्ताहिक गाडी चालवण्यास रेल्वे बोर्डाने हिरवा कंदीला दिला.

कोकण मार्गावर पश्चिम मार्गावरून वसईमार्गे धावणारी वांद्रे-मडगाव गाडी वांद्रे येथून सकाळी 6.50 वाजता सुटते. तब्बल 12 तास 10 मिनिटे इतका अवधी घेऊन सायंकाळी 7 वाजता सावंतवाडी येथे पोहचते. जवळपास एवढय़ाच अंतराच्या प्रवासासाठी सकाळी 7.10 वाजता सीएसएमटी मुंबईवरून सुटणाऱया मांडवी एक्प्रेसचा सावंतवाडी येथील वेळ सायंकाळी 4 वाजून 28 मिनिटे असा आहे. म्हणजेच या प्रवासाला मांडवी एक्प्रेस 9 तास 18 मिनिटे इतका अवधी घेते.

वेळेतही बदल नाही

वांद्रे-मडगाव गाडीला कोकण मार्गावर मोजकेच थांबे देण्यात आले आहेत. गणेशोत्सवात गाडीच्या क्षमतेपेक्षा 10 ते 15 टक्के अधिक प्रवाशांनी प्रवासही केला. सद्यस्थितीत प्रवासी संख्या पुरती घटली आहे. प्रवासी संख्या 70 ते 78 टक्क्यांवर येऊन ठेपल्याचे समजते. कोकण रेल्वेने 1 नोव्हेंबरपासून बदललेल्या बिगर पावसाळी वेळापत्रकानुसार रेल्वेगाडीच्या वेळेतही बदल केलेला नाही. यामुळे प्रवाशांचा हिरमोड झाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;