मोहन जोशी यांना ‘रंगकर्मी’ जीवनगौरव

मोहन जोशी यांना ‘रंगकर्मी’ जीवनगौरव

मराठी नाटय़ कलाकार संघातर्फे दिला जाणारा ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना जाहीर झाला. मराठी नाटय़ कलाकार संघातर्फे आयोजित ‘जागतिक रंगकर्मी दिवस’ सोहळय़ात मोहन जोशी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. हा सोहळा 25 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात पार पडेल.

‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान सोहळय़ासह ज्ञानेश पेंढारकर यांचा सांगीतिक कार्यक्रम सादर होईल. तसेच मोहन जोशी यांची प्रकट मुलाखतही होईल. या कार्यक्रमाला सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे, अशी माहिती मराठी नाटय़ कलाकार संघातर्फे देण्यात आली.

  मराठी रंगभूमीसाठी सर्वस्व वाहिलेल्या नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून 25 नोव्हेंबर हा दिवस कलाकार संघातर्फे ‘जागतिक रंगकर्मी दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी एका ज्येष्ठ व श्रेष्ठ रंगकर्मीचा सन्मान करण्यात येतो. व्यावसायिक रंगभूमीवर काम करणाऱया व रंगभूमीवरील सक्रिय रंगकर्मीचाही हक्काचा एक दिवस असावा, या उद्देशाने ‘जागतिक रंगकर्मी दिवस’ ही संकल्पना कलाकार संघाचे माजी अध्यक्ष प्रदीप कबरे यांनी राबविण्यास सुरुवात केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;