सामाजिक कार्यकर्ते राजाराम महामुणकर यांचे निधन
सामाजिक कार्यकर्ते राजाराम ऊर्फ बापू बाबुराव महामुणकर यांचे हदयविकाराने नुकतेच निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. मुंबई व महाड येथील विविध सामाजिक कामात त्यांचे भरीव योगदान होते. महाडच्या नांद्रुकी-पेडामकर वाडी परिसरात मुलांसाठी शाळा सुरू करणे, रस्ता मंजूर करणे, एसटी व्यवस्था इ. कामांसाठी त्यांनी मोलाची कामगिरी केली होती. तसेच काळ नदीवरील पूल बांधकामासाठी त्यांनी पुढाकार घेऊन काम केले होते. मुलुंड मराठा मंडळ, ज्येष्ठ नागरिक मंच अशा विविध संस्थांचे ते सदस्य होते. या संस्थांच्या विविध उपक्रमांत ते सहभागी होत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List