वाढदिवसा दिवशीच हिंदुस्थानी विद्यार्थ्याचा अमेरिकेत मृत्यू
हिंदुस्थानातील तेलंगणाचा मूळ रहिवासी असलेल्या 23 वर्षीय विद्यार्थ्याचा अमेरिकेत मृत्यू झाला आहे. स्वतःच्या वाढदिवसाला त्याने चुकून स्वतःवरच गोळी झाडल्याने त्याचा मृत्यू ओढवला. आर्यन रेड्डी असे या विद्यार्थ्याचे नाव असून 13 नोव्हेंबर रोजी त्याचा वाढदिवस होता. तो अमेरिकेतील जॉर्जिया येथील अटलांटा येथे राहतो. वाढदिवसा दिवशी त्याने त्याची शिकारीची बंदुक स्वच्छ करण्यासाठी बाहेर काढली. परंतु, ती स्वच्छ करताना त्याच्या हातून ट्रिगर दाबला गेला आणि त्याच्या छातीत गोळी लागून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List