Viral Video – बोलणं बंद केल म्हणून 20 वर्षीय तरुणीवर जीवघेणा हल्ला, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Viral Video – बोलणं बंद केल म्हणून 20 वर्षीय तरुणीवर जीवघेणा हल्ला, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

तमिळनाडूतील मदुराईमध्ये एका 20 वर्षीय तरुणीवर 25 वर्षीय तरुणाने हल्ला केला आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सिद्धीक राजा आणि पीडित तरुणी हे शाळेत असल्यापासून एकमेकांना ओळखत होते. मात्र, मागील पाच महिन्यांपासून पीडित तरुणीने सिद्धीक राजा सोबत बोलणं बंद केलं होतं. त्यामुळे तो अस्वस्थ झाला होता. वारंवार तो पीडितेला फोन करून त्रास देत होता. दरम्यान, रविवारी (17 नोव्हेंबर) पीडित तरुणी मदुराईत ओठाकडाई येथील एका फोटोंच्या दुकानामध्ये काम करत होती. तेव्हा आरोपी सिद्धराज एका नातेवाईकासोबत दुकानामध्ये आला आणि पीडितेला जाब विचारण्यास सुरुवात केली. तसेच माझं तुझ्यावर प्रेम आहे, असं म्हणताच पीडितेने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे आरोपीला राग अनावर झाला आणि त्याने पीडितेवर हल्ला केला. या हल्ल्यात पीडिता गंभीर जखमी झाली असून तिला तत्काळ राजाजी या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीचा शोध सुरू केला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;