महाविकास आघाडीच्या 175 जागा निवडून येणार, नाना पटोले यांनी व्यक्त केला विश्वास
महाविकास आघाडीच्या 175 जागा निवडून येणार, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत. ते म्हणाले की, ”आम्हाला बहुमत मिळेल आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल.”
नाना पटोले म्हणाले की, ”निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीला 175 जागा मिळणार. 23 तारखेला भाजपची पडझड होणार आहे. बंडखोर उमेदवार आमच्या संपर्कात आहेत. 23 तारखेला निकाल लागेल आणि 25 तारखेला नवीन सरकार स्थापन होईल, असंही ते म्हणाले.
पटोले म्हणाले, “आम्ही निवडून आलेल्या आमदारांना सुरक्षित ठिकाणी हलवणार आहोत. भाजपने राजकीय व्यवस्थेत आमदार फोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आम्ही सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहोत.”
याआधी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले होते की, ”उद्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. यात कुठलीही गडबड होऊ नये म्हणून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आम्ही निर्देश दिलेले आहेत. कारण गडबड झाली तर जिंकणारी निवडणूकही हरता येते हे आपण पाहिलंय. त्यामुळे संपूर्ण सतर्कतेने आम्ही मतमोजणीवर लक्ष ठेव.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List