‘पुष्पा 2’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, हिंदू भावना दुखावल्याचा आरोप; हरियाणात तक्रार दाखल

‘पुष्पा 2’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, हिंदू भावना दुखावल्याचा आरोप; हरियाणात तक्रार दाखल

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा अपकमिंग चित्रपट ‘पुष्पा 2: द रूल’ वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. प्रदर्शित होण्याआधीच चित्रपट बॅन करण्याची मागणी होत आहे. चित्रपटातील एका दृश्यावर आक्षेप घेत हरियाणात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हरियाणातील हिसारच्या एका गावात चित्रपटाविरोधात तक्रार दाखल केली आहे. चित्रपटात हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत कुलदीप कुमार नामक व्यक्तीने ही तक्रार दाखल केली आहे.

‘पुष्पा 2: द रूल’च्या ट्रेलरमध्ये अल्लू अर्जुन अर्धनारीश्वरच्या भूमिकेत दाखवण्यात आला आहे. यात काली माताचा फोटोही दिसत आहे. तक्रारदाराच्या मते या दृश्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. तक्रारदाराने माँ काली आणि अल्लू अर्जुनचा अर्धनारीश्वरचा सीन चित्रपटातून काढून टाकण्याची मागणी केली आहे. तसे न केल्यास हरियाणात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नाही. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करू, असे पोलिसांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;