क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी तेलुगु चित्रपटातून डेब्यू करणार

क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी तेलुगु चित्रपटातून डेब्यू करणार

टीम इंडियाचा गोलंदाज युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा लवकरच तेलुगु चित्रपटातून डेब्यू करणार असल्याची चर्चा आहे. धनश्री वर्मा आपले सौंदर्य आणि डान्समुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र आता अभिनयामुळे पुन्हा एकदा धनश्री चर्चेत आली आहे.

धनश्री डेब्यू करत असलेल्या तेलुगु चित्रपटाचे नाव Akasham Dati Vastava असे आहे. दिल राजू या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. कोरिओग्राफर यश देखील या चित्रपटात लीड रोलमध्ये दिसणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील टॉपची अभिनेत्री कार्तिका मुरलीधरनही या चित्रपटात भूमिका करणार आहे. धनश्री वर्माही या चित्रपटात महत्वाची भूमिका निभावणार आहे.

हा चित्रपट डान्सवर आधारित असल्याचं बोललं जात आहे. यामुळेच युजवेंद्रची पत्नी धनश्रीला या चित्रपटासाठी अप्रोच करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, चित्रपटातील भूमिका पाहूनच धनश्री हा चित्रपट करायचा की नाही हे ठरवणार आहे.

धनश्री वर्मा अलीकडेच ‘झलक दिखला जा 11’ या डान्स शो मध्ये सहभागी झाली होती. या शोमध्ये तिने वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. धनश्रीने आपल्या डान्सने सर्वांना प्रभावित केले असले तरी ती हा शो जिंकू शकली नाही. मात्र तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ती डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;